भगवदगीता अध्याय चार : ज्ञान कर्म सन्यासयोग भावार्थ । bhagawadgeeta chapter 4

Bhagawadgeeta chapter 4

bhagwad geeta chapter 4
भगवद गीता अध्याय चार 


अध्याय तीन मध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला कर्मयोग बद्धल सांगतात त्यामध्ये संपूर्ण जीवनामधील कर्माचे काय महत्व आहे तशेच कर्म कसे करावे या बद्धल सर्व अध्याय तीन आहे .आता आपण भगवद गीता अध्याय चार बघणार आहोत कि या अध्याय मध्ये भगवान श्री कृष्ण काय सांगतात . 

भगवदगीता अध्याय चौथा : ज्ञान कर्म संन्यासयोग असा आहे . 

अध्याय चार मध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात कि आता मी जे ध्यान तुला देणार आहे ते ज्ञान माझ्या कडून सुर्यभगवानाला दिले होते आणि त्यानंतर मानवतेचा  पूर्वज म्हणजेच मनू याला दिले .आणि आता हे मी तुला देत आहे .  पण अर्जुन भगवान श्री कृष्णनांना विचारतो ,कि हे ज्ञान तुम्ही सुर्यभागवानांना कसे देऊ शकता आणि ते कशे शक्य आहे कारण ,भगवान श्री कृष्णाचा जन्म सुर्यभागवान नंतर झाला ?

या वरती श्रीकृष्ण उत्तर देतात , तुम्ही असो व मी या भूतलावरती अनेक जन्म घेतले आहेत आणि हा आत्मा अमर आहे .पण जेव्हा जेव्हा धार्मिकतेचा ऱ्हास होईल लागतो आणि अधर्माचा उदय होण्यास सुरुवात होते तेव्हा सत्याचे रक्षण करण्या साठी आणि धर्माकरिता मी मानवी स्वरूपात पुन्हा प्रकट होतो . 

श्रीकृष्ण म्हणतात , जो कोणी हे सत्य जाणतो आणि ज्ञानाच्या अग्नीने संपूर्ण शुद्ध होतो तो परमात्म्याची प्राप्ती करतो .आणि ज्यांना यशाची इच्छा आहे . देवांची पूजा करतात आणि इच्छित विधी करून ते त्या मध्ये त्वरित पनाने यश मिळवतात . आणि मागील अध्याय मध्ये सांगितल्या प्रमाणे कर्म करीत राहण्या साठी सांगतात . 

तर आता कर्म म्हणजे काय ? आणि अयोग्य कृती काय आणि निष्क्रियता काय ? 

या बद्धल बोलतात , खरा योगी तो नवे कि जो चांगले काम/कर्म  करून त्याबदल्यात काही तरी हवे असे सांगतो तर खरा योगी तो आहे जो चांगले काम/कर्म  करून काहीही नको अशी अपेक्षा ठेवतो ."bhagawadgeeta chapter 4"

श्रीकृष्ण म्हणतात - जेव्हा मनुष्याने केलेल्या  कर्माच्या फळाची वासना सोडली, तेव्हा तो मनुष्य सदैव समाधानी आणि सुखी राहू शकेल .जी व्यक्ती इतरांचा मत्सर करत नाही, यशात किंवा अपयशात स्थिर असते, वासनांपासून लांब असून वासना मुक्त असते आणि आपण केलेले  कर्म/कार्य परमात्म्याला अर्पण करते, अशा व्यक्तीचे कर्म बंधन विसर्जित होते.What is Chapter 4 in Gita about?

जन्म-मृत्यूच्या फेऱ्या मधून मुक्ती आणि अनंतकाळाची प्राप्ती हि फक्त त्यागामधून होऊ शकते . हे करण्यासाठी योगी विविध पद्धतीचा वापर करत असतात , त्या मध्ये जसे कि देवांना अर्पण करणे किंवा इंद्रियांचा आत्मसंयम राखणे . काही योगी  भौतिक संपत्तीचा प्रसाद देतात , तर काही योगी तपश्चर्या करतात. किंवा स्व:अभ्यासातून ते ज्ञान मिळवतात .

दुसरी पद्धत म्हणजे प्राणायाम द्वारे महत्वाच्या श्वासावर नियंत्रण ठेवणे , श्वासोच्छवासाची शक्ती स्वासोच्छवासास समर्पण करणे . काही योगी त्यांच्या आहारावरती नियंत्रण ठेवतात ,हा देखील एक त्यागाचा प्रकार आहे . 

__________________________________समाप्त________________________________________


अध्याय तीन वाचण्या साठी इथे दाबा 👈

अध्याय पाच वाचण्यासाठी इथे दाबा👉

Post a Comment

0 Comments